डी. के. ऐ. एस. सी. महाविद्यालयाचे बॉक्सिंग स्पर्धेत यश.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डी. के. ऐ. एस. सी. महाविद्यालय, इचलकरंजी मधील खेळाडूंनी शहाजी कॉलेज कोल्हापूर यांच्या विद्यामानाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे दी. ३ व ४ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न झालेल्या अंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. तीन विद्यार्थिनिनी वजनी गटात चांगली कामगिरी करत सुवर्ण पदक प्राप्त केले. अलिशा नाईकवाडी हिने ६३ ते ६६ किलो वजनी गटात, श्रुती लोहार हिने ६६ ते ७० किलो वजनी गटात तर अंकिता पाटील हिने ५७ ते ६० वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदकाची कमाई केली. या तिन्ही विद्यार्थिनिची जालंदर येथे होणाऱ्या अखिल भारतीय अंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही तिन्ही विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या संघाचे नेतृत्व करणार आहेत. या खेळाडूंचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या यशस्वी खेळाडूंना प्रा. मुजफ्फर लगीवाले, मेजर मोहन वीरकर व जायकुमार करके यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment